बुधवार, दि.२६ जानेवारी २०२२ रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे “७३ वा प्रजासत्ताक दिन” कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री.रोहनजी परिचारक यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद, प्राचार्या तसेच शिक्षकेत्तर कर्मचा-यांना खूप-खूप शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक (Trustee) डॉ.श्री पारस राका सर उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाची सुरवात सकाळी ठीक ८.०० वा. झेंडापूजन करून करण्यात आली. यावेळी प्रशालेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, माजी नगरसेवक श्री आप्पा राऊत, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या सौ सोनाली पवार यांनी पुष्पगुच्छ देवून केले. प्रमुख पाहुणे श्री राका सर या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशालेतील इ.२री चा विद्यार्थी कु.तक्ष राऊत याने प्रजासत्ताक दिनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री मंगेश भोसले यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता झेंडावंदनाने करण्यात आली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…