युटोपियन शुगर्स लि. येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात परिचारक बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, सी.एन. देशपांडे, महादेव लवटे, सुरेश टीकोरे यांचे समवेत कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी ,कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
पुढे बोलताना परिचारक म्हणाले की,
युटोपीयन शुगर्स या कारखान्याची उभारणी ही मुळातच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे असणाऱ्याअतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागावा व या मंगळवेढ्या सारख्या कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी मिळावी तसेच बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने झालेली आहे. कारखान्याचा सध्याचा आठवा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालू आहे मागील सात ही गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक व कर्मचारी यांचा विश्वास संपादन केल्याने चालू गळीत हंगामामध्ये कारखाना आपले अपेक्षित उद्दिष्ट निश्चित पूर्ण करेल. युटोपीयन शुगर्स कडे ऊस पुरवठा करण्यासाठी अनेक ऊस उत्पादक इच्छुक आहेत मात्र ऊस गाळपाची सध्याची क्षमता ही मर्यादित असल्याने ऊस उत्पादकांना थोडा जास्तीचा वेळ ऊस तोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. प्रत्येक ऊस उत्पादकास आपल्या उसाचे गाळप लवकर व्हावे असे वाटते आहे.मात्र, योग्य त्या नियोजनानुसार सर्वांच्या ऊसाचे गाळप करणार असून कारखान्याकडे असलेल्या नोंदीतील सर्व ऊसाचे गाळप केल्याशिवाय गळीत हंगामाची सांगता करणार नसून ऊस उत्पादक यांची ऊस गाळपाची अडचण ओळखून येत्या काळात कारखान्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमतेमध्ये वाढ करणार असल्याचे जाहीर करण्याबरोबरच कारखान्याच्या प्रगती मध्ये कामगार वर्गाचे असणारे योगदान विचारात घेऊन सर्व कर्मचारी वर्गाला 12 टक्के वेतन वाढ जानेवारी 2022 पासून देणार असल्याची घोषणाही परिचारक यांनी केली व उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन अभिजीत यादव यांनी केले.