ताज्याघडामोडी

पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचा पदार्फाश

मुंबईतील दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे.

मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईतील दहिसर परिसरात क्राईम ब्रांचने धडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता.

पण पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे.

या आरोपींकडून 7 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. औरंगाबादमध्ये इंजिनिअरने घरीच छापल्या नोट्या! दरम्यान, मागील महिन्यातच औरंगाबाद मधील इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापल्याता प्रकार समोर आला होता.

संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता. धक्कादायक म्हणजे, यापूर्वीदेखील बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर देखील झटपट श्रीमंत होण्यासाठी समरान ऊर्फ लक्की याने बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती. कारागृहातून सुटल्यावर समरान याने आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला.

मुकुंदवाडी येथे भाड्याच्या खोलीत समरान आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून सर्व आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 500 रुपये, 100 रुपये आणि 50 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश होता. यासोबतच पोलिसांनी घटनास्थळावरुन कम्प्युटर, प्रिंटर, कागद असा ऐवजही ताब्यात घेतला आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

13 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

13 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago