महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना फाईल परिक्षणसाठी देताना शासकीय प्रक्रियेचे पालन न केल्याप्रकरणी तसेच छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याप्रकरणी नगरविकास विभगातील तीन अधिकारी यांच्यासह किरीट सोमय्या यांना मंगळवारी नोटीस बजावण्यात आली आहे.
सोमय्या यांनी 17 जानेवारी रोजी नगरविकास विभागाकडे माहिती अधिकारांतर्गत नस्तीच्या परिक्षणाची मागणी केली होती. त्यांनी 21 जानेवारीचा वेळ मागितला होता. त्यांच्या अर्जावर नगरविकास विभागाच्या कार्यासनाने 24 जानेवारीचा वेळ दिला. सोमय्या हे अधिकाऱयांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळतानाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते.
या छायाचित्रात नगरविकास विभागातील अधिकारी सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचे दिसत आहेत. यावर काँग्रेसने टीका केली होती. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी सोमय्या यांना मंत्रालयातील कार्यालयात मिळालेल्या थेट प्रवेशावर आक्षेप घेतला होता.
किरीट सोमय्या कोणत्या अधिकाराखाली या ठिकाणी गेले, असा सवाल त्यांनी केला होता. सोमय्या यांच्यावर गोपनीयतेच्या कायद्याचे उल्लंघन आणि सरकारी कार्यालयात घुसखोरीबद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…