कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष 1 फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष 1 फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. परंतु कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापिठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पुर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश मिळणार. 15 फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणा-या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात तर त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या किंवा ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे.
सोमवारपासून शाळा सुरु झाल्या. मात्र 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु असतानाही महाविद्यालयं सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नव्हता. शाळा सुरु होत असताना महाविद्यालयं कधी सुरु होणार असा असा प्रश्न होता. कोरोना काळात दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असताना तिसऱ्या लाटेत पुन्हा महाविकास आघाडी सरकारने शाळांवर गंडांतर आणत शाळा महाविद्यालये बंद केली होती.
राज्यात व देशात 15 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू केले असताना कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे कमी असल्याने इतर आस्थापन, बार मॉल हे सर्व सुरू आहे. परंतु, शाळा महाविद्यालये बंद ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटणे सारखे असून शासनाने तत्काळ शाळा महाविद्यालये सुरू करावीत अशी मागणी करण्यात येत होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…