नाशिकमध्ये आज मंगळवारी दुपारी एक अतिशय धक्कादायक घटना घडली. त्यामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी आणि पालक यांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला.
त्याचे झाले असे की, एक स्कूल बस आग लागल्यामुळे जळून खाक झाली. मात्र, या घटनेत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. त्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील पंचवटी परिसरात ही घटना घडली. या बसमध्ये विद्यार्थी आणि दोन शिक्षिका होत्या. मात्र, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
कशी घडली घटना?
नाशिकमधील पंचवटी – म्हसरूळ भागात ही घटना घडली. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती मावळली आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आज शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येत होते. तेव्हा अचानक एका स्कूल बसला आग लागली. त्यामुळे विद्यार्थी आणि आतील दोन शिक्षिका या घाबरून गेल्या.
दरम्यान, गाडीला आग लागल्याचे समजताच चालकाने गाडी थांबवून विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. तसेच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.हे पथक येईपर्यंत स्कूल बस व्हॅन जळून खाक झाली. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
आता ही घटना नेमकी कशामुळे झाले याची चर्चा रंगली आहे. प्राथमिकदृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…