जोगेश्वरीत जान्हवी विजय चव्हाण नावाच्या 21 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये पप्पा, यात सर्व पुरावे आहे, सोडू नका त्या, असं लिहित आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात मेघवाडी पोलिसांनी निखील नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
जान्हवी जोगेश्वरीच्या रामवाडी परिसरात आपल्या वडिलांसोबत राहात होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचं निधन झाल्यानं तिच्या मोठ्या भावाचं लग्न लावून देण्यात आलं. हा भाऊ सध्या विरारला असतो.
जान्हवी अंधेरीतील कोरोना लसीकरण केंद्रात अटेन्डंट म्हणून काम करायची. तर तिते वडील पालिकेतील जल विभागात फिटर म्हणून काम करत असल्याने कामानिमित्त सतत बाहेर असायचे. याच कारणामुळे अनेकदा जान्हवी घरी एकटीच असायची.
रविवारी रात्रीही साडेबाराच्या सुमारात ते घरी परतले आणि घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, बराच वेळ काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता जान्हवी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडून तिला रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आणि तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. यात तिने निखील आणि त्याची बहीण अक्षया यांनी आपल्याला त्रास दिल्याचं म्हटलं. सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला. तिने सांगितलं की ‘यात सर्व पुरावे आहे, त्यांनी मला फसवलं आणि निखीलने बाहेर संबंध ठेवले. त्याला सोडू नका.’ पोलीस सध्या याच अंगाने घटनेचा तपास करत आहेत.
जान्हवीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं, ‘सॉरी पप्पा, तुम्हाला एकटं सोडून गेली. मला जायचं नव्हतं; पण सहन होत नव्हतं. मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, त्याच्याशिवाय माझं कोणी नव्हतं. मला एकटं वाटायचं तेव्हा मी त्याला फोन करायची; पण तो माझ्या भावनांशी खेळला आणि घरच्यांचे कारण देत मला सोडलं. आय लव्ह यू पप्पा, काळजी घ्या’.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…