सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या सांगलीतील निवासस्थानी राडा झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका निविदेच्या वादातून हाणामारी झाली असल्याचे म्हटले जात आहे.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या पतीने ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, मंगळवारी सकाळी ही तक्रार मागे घेण्यात आल्याने दोन गटातील वादावर पडदा पडला असल्याची चर्चा सुरू आहे.
आरोच्या निविदेवरून दोन गटात वाद झाल्याची चर्चा आहे. निविदेवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून हाणामारी आणि तोडफोड करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांचे पती नंदू कोरे, कुटुंबातील अन्य आणि जिल्हा परिषद सभापती आणि काही सदस्यांमध्ये वाद झाला.
जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवासस्थानात दारू पिऊन येऊन सभापती आणि काही सदस्यांनी मला आणि माझ्या भावास मारहाण केल्याचा आरोप नंदू कोरे यांनी केला. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवासस्थानाततील खुर्च्या, कुंड्याची देखील तोडफोड करण्यात आली.
या तोडफोड प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती भाजपचे प्रमोद शेंडगे, भाजपच्या महिला बाल कल्याण सभापती सुनिता पवार यांचे पती सुनील पवार, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील यांचे पती सुनील पाटील, भाजपचे अरुण बालटे, अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
तर, प्रमोद शेंडगे यांनी आरोप फेटाळून लावत आम्हालाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे पती आणि दीर यांनी मारहाण केली असल्याचा आरोप केला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…