समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दामू नगर येथील ऑटो चालक शाहरुख शेख याला काही गुंडांनी चोर समजून बेदम मारहाण केली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाहरुखला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेले आणि मेडिकल करून त्याला घरी पाठवले. दुसऱ्या दिवशी शाहरुखचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
चोर समजून ऑटोचालकाला बेदम मारहाण
शाहरुखच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शाहरुखच्या कुटुंबाव्यतिरिक्त शेकडो स्थानिक रहिवाशांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. हातात शाहरुखच्या मारेकऱ्यांचे बॅनर पोस्टर घेऊन कुटुंबीय आयुक्तांकडे न्यायाची याचना करत होते.
काही वेळानंतर समता नगर पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणले. शाहरुखच्या भावाने आरोप केला आहे की शाहरुखची हत्या करणारे दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक आहेत. त्यामुळे समता नगर पोलीस शाहरुखच्या मारेकऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवत नाहीत.
धरणे आंदोलनाच्या वेळी तेथील डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी शाहरुखच्या कुटुंबीयांना सांगितले की, शाहरुखचे पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासणीत जे काही समोर येईल, तेच गुन्हेगारांवर पुढील कारवाई केली जाईल.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…