ताज्याघडामोडी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तान अर्थसहाय्यित खोटी वृत्त नेटवर्क केली ब्लॉक

 डिजिटल मीडियावर समन्वित पद्धतीने भारतविरोधी बनावट वृत्त पसरवण्यात गुंतलेल्या 35 यूट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि 2 संकेतस्थळे ब्लॉक करण्याचे आदेश  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या यूट्यूब खात्यांची एकूण सदस्य संख्या 1 कोटी 20 लाखांहून अधिक आहे आणि त्यांच्या  व्हिडिओजना 130 कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. याव्यतिरिक्त, इंटरनेटवर भारतविरोधी चुकीची माहिती पसरवण्यात समन्वित सहभागाबद्दल दोन ट्विटर खाती, दोन इंस्टाग्राम खाती आणि एक फेसबुक खातेदेखील  सरकारने ब्लॉक केले आहे.

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 च्या नियम 16 अंतर्गत जारी केलेल्या पाच स्वतंत्र आदेशांनुसार, मंत्रालयाने ही पाकिस्तान स्थित सोशल मीडिया खाती आणि संकेतस्थळे  ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय गुप्तचर संस्था या सोशल मीडिया अकाऊंट्स आणि वेबसाइट्सवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या आणि त्यांनी तात्काळ कारवाईसाठी ती चिन्हांकित केली होती.

काम करण्याची पद्धत : समन्वित अपप्रचार नेटवर्क्स

मंत्रालयाने ब्लॉक केलेली सर्व 35 खाती पाकिस्तानातून कार्यरत होती आणि चार समन्वयित अपप्रचार नेटवर्क्सचा  भाग होती.

ही सर्व नेटवर्क्स खोटी वृत्त पेरून भारतीय प्रेक्षकांची दिशाभूल करणे या एकाच ध्येयाने चालवली जात असल्याचे दिसून आले. नेटवर्कचा भाग असलेल्या वाहिन्या कॉमन हॅशटॅग आणि समान संपादन शैली वापरत होत्या. त्या सामान्य व्यक्तींद्वारे संचालित होत्या आणि एकमेकांच्या सामग्रीचा प्रचार करत होत्या. काही यूट्यूब वाहिन्या  पाकिस्तानी टीव्ही वृत्तवाहिन्यांचे निवेदक चालवत होते.

सामग्रीचे स्वरूप

मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या यूट्यूब वाहिन्या, संकेतस्थळे  आणि इतर सोशल मीडिया खाती पाकिस्तानकडून  भारताशी संबंधित संवेदनशील विषयांवर भारतविरोधी खोटी वृत्ते पसरवण्यासाठी वापरल्या जात होत्या. यामध्ये भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर आणि इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध यासारख्या विषयांचा समावेश आहे. माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबाबत यूट्यूब चॅनेलवरून मोठ्या प्रमाणावर खोटी वृत्त पसरवण्यात आल्याचे दिसून आले. या यूट्यूब वाहिन्यांनी पाच राज्यांतील आगामी निवडणुकांच्या लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्यासाठी आशय पोस्ट करण्यास सुरुवात केली होती.

या वाहिन्यांनी फुटीरतेला खतपाणी घालणारा, धर्माच्या आधारे भारताचे विभाजन करणारा आणि भारतीय समाजातील विविध समुदायांमध्ये वैर निर्माण करणाऱ्या  सामग्रीचा प्रचार केला.

ही कारवाई, सरकारने अलीकडेच डिसेंबर, 2021 मध्ये 20 यूट्यूब वाहिन्या आणि 2 संकेतस्थळे ब्लॉक केल्याच्या अनुषंगाने आहे. तेव्हा माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर अशा भारतविरोधी खोट्या वृत्त जाळ्यांवर कारवाई करण्यासाठी पहिल्यांदा केला गेला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago