औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी भागातील ताजनापूर येथे मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. मित्रांसाठी बाय बाय स्टेटस ठेवत महाविद्यालयीन विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. राजेश ज्ञानेश्वर काळे (१८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थी असणाऱ्या राजेशने घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेले असताना आपल्या मोबाईलवर बाय बाय असे स्टेटस ठेवले, त्यानंतर आपल्या राहत्या घरात कापडाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेशचे स्टेटस पाहून गावातील मित्रांसह ग्रामस्थांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने तोपर्यंत घरात आत्महत्या केल्याचे आढळून आला.
नंतर गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती बाजारसावंगी पोलीस चौकीस कळविल्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने राजेशचे प्रेत खाली उतरवले. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.राजेशने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलल्याने नातेवाईक, गावकऱ्यांसह त्याच्या मित्रांना धक्काच बसला आहे. पण राजेशने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचं कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने बाजारसावंगी पोलीस तपास करतायत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…