भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या बैठकीमध्ये जहाज डिझाईन आणि बांधकाम समितीसाठी तज्ञ भारतीय प्रतिनिधी म्हणून स्वेरीचे माजी विद्यार्थी डॉ. सुधीर सिंदगी यांची निवड केली आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या परिषदेत भारताचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाल्यामुळे डॉ. सुधीर सिंदगी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सन २००४ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातुन शिक्षण घेवून उत्तीर्ण झालेले डॉ. सुधीर चंद्रशेखर सिंदगी यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालयाने भारताचे उच्चायुक्त, इंडिया हाऊस, लंडन यांच्याकडे त्यांचे नाव प्रस्तावित केले होते. त्यानंतर त्यांच्या नावाला भारताचे उच्चायुक्त आणि आयएमओ यांनी दिलेल्या मान्यतेनुसार दि.१७ जानेवारी ते दि.२१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने झालेल्या सत्रामध्ये डॉ.सिंदगी यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय शिपिंगची सुरक्षितता आणि जहाजाद्वारे होणाऱ्या सागरी आणि वातावरणातील प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असलेली आयएमओ ही युनायटेड नेशन यांची विशेष नियामक एजन्सी आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांना समर्थन देण्याचे कार्य असलेल्या आयएमओच्या छत्रछायेखाली वेगवेगळ्या समिती संघटित केल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक देशाकडून सहा ते आठ तज्ञ अधिकाऱ्यांची शिफारस केली जाते आणि त्यानुसार त्या तज्ञांच्या नावास आयएमओ मान्यता देते. त्यानुसार या समित्या वर्षभर बैठका घेऊन आंतरराष्ट्रीय नियमावली बनवत असतात.
या वर्षी भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालयाने जहाज डिझाईन आणि बांधकाम समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्या तज्ञ भारतीय अधिकाऱ्यांमध्ये डॉ. सिंदगी यांच्या नावाची शिफारस केली होती. डॉ. सिंदगी हे मुळचे मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील असून त्यांनी स्वेरीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने संशोधनाचा पाया रचला. त्यावेळी त्यांनी स्वेरीच्या वसतिगृहात राहून प्रचंड मेहनत घेतली व त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यावेळी सन २००३-०४ साली शिवाजी विद्यापिठाची शिष्यवृत्ती देखील त्यांनी मिळविली. त्या काळात स्वेरीतर्फे विद्यापीठ प्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी म्हणून देखील त्यांनी काम पहिले होते. ‘डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम कसे करायचे? हे शिकल्यामुळेच आज मी ज्या पदावर आहे त्याचे संपूर्ण श्रेय डॉ. रोंगे सरांना जाते. पायाभरणी भक्कम झाल्यामुळे आज माझा जहाज बांधणी व डीझाईन मध्ये काम करताना उत्साह वाढतो.’ अशी प्रतिक्रिया डॉ. सिंदगी यांनी यावेळी दिली. पुढे त्यांनी आयआयटी खरगपूर मधून एम.टेक.चे शिक्षण पूर्ण केले तर २०२० साली आयआयटी मद्रास येथून पीएच.डी पूर्ण केली. सध्या ते पुण्याच्या मरीन इंजीनिअरिंग मध्ये संशोधन विभागात प्रमुख पदावर काम पहात आहेत.’ स्वेरीचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. सिंदगी यांची आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये निवड झाल्यामुळे त्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, स्वेरीमध्ये संशोधन विभागाचा पाया भक्कमपणे रचणारे डॉ. प्रशांत पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.
पंढरपूर (दि.04) :- इयत्ता दहावीच्या उर्वरित पेपर साठीची परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात याव्यात. तालुक्यात बोर्डाच्या…
येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये विज्ञानदिनानिमित्त प्रशालेच्या नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन…
पंढरपूर/प्रतिनीधी पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान…
अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये गुणात्मक बदलासाठी महत्वपूर्ण प्रबंध सादर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी…
पंढरपूर Gbs साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज आहे, पंढरपूर नगरपालिका…
सोलापूर दि.14 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात…