पंढरपूरात कार शोरूम मध्ये वैतागलेल्या कार मालकाने केली तोडफोड

पंढरपूर शहरानजीक असलेल्या वाखरी हद्दीत रेनॉल्ट कार कंपनीचे शोरुम असून दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास रेनल्ट क्वीड गाडीमधुन आलेल्या इसमाने त्याची गाडी शोरुमचे समोर लावुन गाडीतुन एक अंदाजे 3 ते 4 फुट लांबीचा लोखंडी पाईप घेवुन शोरूम मध्ये प्रवेश करत तुम्ही मला बाहेरच्या गाडीची चावी द्या नाहीतर मी शोरुम मधील गाड्या व काचा फोडणार आहे अशी धमकी दिली.या बाबत सदर शोरूम मध्ये कामावर असलेले नवनाथ हणमंत पवार यांनी तुमची काय अडचण आहे अशी विचारणा केली असता सन 2018 मध्ये आपल्या शोरुममधुन रेनल्ट क्वीड गाडी घेतली असुन चार वर्षे झाली अद्याप पर्यंत माझी गाडी आर.टी.ओ. कडे नोंदणी झालेली नाही असे कारण सांगितले.
रेनल्ट कंपणीचे बिझनेस हेड अंकुर प्रताप सिंग यांना फिर्यादीने फोन लावुन संदेश ज्ञानदेव आसबे रा. शेळवे ता. पंढरपूर हे शोरुममध्ये आले असुन त्यांची रेनल्ट क्वीड गाडी चार वर्षापासुन नोंदणी झालेली नसल्याने ते सदर गाडी शोरुममध्ये लावुन मला नवीन गाडीची चावी द्या मी नवीन गाडी घेवुन जाणार आहे असे म्हणत आहेत असे हि बाब कानावर घातली.
यावेळी बिझनेस हेड अंकुर प्रताप सिंग यांनी फोनवरुन तुम्ही आर. टी. ओ. यांचा कर भरा तुम्हाला तुमची गाडी नोंदणी करुन देतो असे असता सदर कोणताही टक्स भरणार नाही तुम्ही मला माझी गाडी आहे तशीच नोंदणी करुन द्या संदेश ज्ञानदेव आसबे यांनी अशी मागणी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.यानंतर सदर आसबे यांनी नवीन गाडीची चावी मागितली असता फिर्यादीने देण्यास नकार देत सोबत आणलेल्या लोखंडी पाईपने शोरुममधील एक काचेचा टेबल व एक काचेचा बोर्ड फोडुन अंदाजे 10,000/- रु चे नुकसान करुन बळजवरीने माझ्या पन्टच्या खिशातील निळ्या रंगाची रेनल्ट कायगर गाडीची चावी घेवुन बाहेर लावलेली गाडी घेवुन गेला आहे.अशा आशयाची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी शेळवे तालुका पंढरपूर येथील कार मालकाने रेनॉल्ट कंपनीच्या पंढरपुरातील शोरूम मध्ये तोडफोड केली व दुसरी कार घेऊन गेला अशा आशयाची फिर्याद येथील कर्मचाऱ्याने दाखल केली असली तरी प्रत्यक्षात या घटनेमागील अधिक वास्तव हे पोलीस तपासात पुढे येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

16 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

16 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago