अपुरी पाणीपाळी व आकारली जाणारी अवाजवी पाणीपट्टी याचा पुनर्विचार करा- आ. समाधान आवताडे

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये उजनी पाणी लाभांश शेतकऱ्यांना मिळणारी अपुरी पाणीपाळी व अवाजवी पद्धतीने आकारली जाणारी पाणीपट्टी या संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी प्रश्न उपस्थित करत पुनर्विचार कारण्याची मागणी केली. यावेळी ना.भरणे यांनी आ.आवताडे यांनी मांडलेल्या सुचने बाबत सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाकडे याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

 

बैठक गुगल मीट ॲपद्वारे ऑनलाईन घेण्यात आली. बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव शिंदे, संजय शिंदे, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह.तु. धुमाळ, अधीक्षक अभियंता आणि प्रशासक डी.बी. साळे, उजनी धरण व्यवस्थापकचे कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे, भीमा विकास विभागचे कार्यकारी अभियंता आर.एन. क्षीरसागर यांच्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील कालवा सल्लागार समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भरणे यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या समस्या, मागण्या ऐकून घेतल्या. श्री. भरणे यांनी सांगितले की, 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत डावा आणि उजव्या कालव्यातून पाच टीएमसी तर भीमा-सीना जोड कालव्यातून दीड टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली. दहिगाव उपसा सिंचनसाठी 2 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत 0.15 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी सीना-माढा प्रकल्पाला मार्चच्या पुढे पाणी सोडण्यास सांगितल्याने त्याला मान्यता देण्यात आली आहे.

रब्बी हंगामात गाळ वजा जाता एकूण पाणीसाठा 120.34 टीएमसी तर उपयुक्त 56.68 टीएमसी साठा आहे. याची टक्केवारी 85.06 इतकी आहे. पहिल्या आवर्तनात 6.65 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यामध्ये सीना-माढा प्रकल्पाला मार्चनंतर पाणी सोडण्यात येणार आहे.

बैठकीत उन्हाळ हंगामाचेही नियोजन करण्यात आले. उन्हाळ हंगामासाठी दोन आवर्तन असून यामध्ये पहिल्या आवर्तनामध्ये 16.90 टीएमसी तर दुसऱ्या आवर्तनात 17.90 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यामध्ये कालवा, नदी, जोडकालवा, उपसा सिंचन योजनांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.

शिवाय भीमा नदीला मागणी, परिस्थिती, पाणी साठ्याच्या उपलब्धेनुसार 25 फेब्रुवारी 2022 नंतर पाणी सोडण्यात येणार आहे. उजनी धरणात मार्चअखेर गाळ वजा जाता संभाव्य उपयुक्त पाणीसाठा 106.74 टीएमसी आहे. पाणी नियोजनाचे सादरीकरण श्री. साळे यांनी केले.

1 मार्च 2022 अखेर संभाव्य पाणी वापर
बाष्पीभवन-पाच टीएमसी
जलाशय उपसा सिंचन-4.50 टीएमसी
जलाशय बिगर सिंचन (पिण्यासाठी)-0.85 टीएमसी
जलाशय बिगर सिंचन (औद्योगिक)-0.55 टीएमसी

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago