गुन्हे विश्व

नगरपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री, मारहाणीत एकाचा मृत्यू

राज्यभरातील नगरपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला असून या निकालात भाजपने बाजी मारत 11 जागांवर विजय मिळवला आहे.

तर शिवसेनेला 4 जागा व कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेमुळे साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गालबोट लागण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. साक्री नगरपंचायतीचे प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेनेचे उमेदवार ताराबाई जगताप पराभूत झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी मध्ये व गोटू जगताप या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

यावेळी गोटू जगताप याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. दरम्यान, भावाला वाचविण्यासाठी मोहिनी नितीन जाधव धावून आल्या.

यात भांडणात त्यांनाही मारहाण झाली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. साक्री शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाला होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago