पब्जी खेळाच्या वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या बँक खात्यातून पैसे काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी असदअली अश्रफअली शेख, दिवेश रेड्डी, आतिफ शेख, राजेश बेंडर, रसूल शेखला अटक केली आहे.
तक्रारदाराची काही दिवसांपूर्वी आरोपीसोबत फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मोबाईलवर पब्जी खेळायचे. अटक आरोपीपैकी एकाने तक्रारदाराला पब्जी खेळासाठी आयडी दिला होता. त्या आयडीसाठी चार हजार रुपये मोजले होते.
आयडीसाठी दिलेल्या पैशाच्या वादातून त्याच्यात वाद झाला. रविवारी रात्री असदअली, दिवेश, आतिफ, राजेश रसूल हे खैराणी रोड येथे आले. त्या पाचजणांनी तक्रारदाराला अंधेरीला नेऊन तक्रारदाराला मारहाण केली. मारहाणीनंतर त्याच्या खात्यातून दहा हजार रुपये काढले. त्या पाच जणांकडून तक्रारदाराने स्वतःची सुटका केल्यानंतर या प्रकाराची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
त्यानंतर काहीच वेळात डी. एन. नगर पोलीस घटनास्थळी आले. तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान त्या पाच जणांना डी. एन. नगर पोलिसांनी अंधेरी पश्चिम येथून अटक केली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…