ताज्याघडामोडी

लग्नास नकार दिल्याने संतप्त प्रियसीकडून प्रियकारावर चाकूने वार

लग्नास नकार दिल्याने संतप्त प्रियसीने चाकूने वार करून प्रियकराची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलेली आहे. नागपूरच्या वाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

अक्षय ढोके असे या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर पूजा असे हल्लेखोर प्रेयसीचे नाव आहे. अक्षय एका खाजगी कंपनीत कामाला आहे.पूजा घटस्फोटीत आहे. 

गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पूजा अक्षयला लग्न करण्यासाठी म्हणत होती, तर अक्षय मात्र त्यावरून टाळाटाळ करत होता यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे अक्षयने तिच्याशी बोलणे ही बंद केले होते. तसेच तिचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला होता. 

त्यामुळे संतापाच्या भरात सोमवारी रात्री पूजा अक्षयच्या वाडी परिसरातील निवासस्थानी पोहचली. तिथे चाकूने सपासप अक्षयवर वार केले. पूजाने अक्षयच्या मानेवर, गालावर, मनगटावर, मांडी आणि पाठीवर चाकुने वार केले आहेत. जिवाच्या आकांताने ओरडत अक्षय एक किलोमीटरपर्यंत जखमी अवस्थेतच पळत गेला. स्थानिकांनी जखमी अक्षयला खासगी रुग्णालयात दाखल केले.

सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, प्रेयसी पूजाला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago