पंढरपूर सिंहगडमध्ये “क्रिएटिव्हिटी टू स्टार्टअप बाय इनोवेशन अम्बेसिटर” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

कोर्टी (ता. पंढरपूर ) येथील एस. के .एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग महाविद्यालयात रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

ही कार्यशाळा इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल व इंटरप्रिन्युअर डेवलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता. कार्यशाळेच्या सुरवातीस उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी कार्यशाळा बद्दलचे आपले विचार व्यक्त करून कार्यशाळेचे महत्व ऑनलाईन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सांगितले. क्रिएटिव्हिटी अँड डिझाईन थिंककिंग या विषयावर डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यादरम्यान आय. पी. र अवेरनेस या विषयावर प्रा.अतुल आराध्ये यांनी मार्गदर्शन केले. इंक्युबॅशन सपोर्ट फोर इंनोवेशन या विषयावर प्रा. अमोल जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी महाविद्यालयातील ई डी सी सेल बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यानंतर स्टार्ट स्टार्टअप इन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय याबद्दल प्रा. धनंजय गिराम यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना पेटंट फायलिंग प्रोसेस व उद्योजकता विकास याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून भविष्यात विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा खुप मोठा उपयोगी होणार आहे.कार्यशाळेचे आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचे समन्वयक चे काम प्रा. विक्रम भाकरे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. प्रदीप व्यवहारे , प्रा. गणेश बिराजदार, प्रा. विजय चव्हाण, प्रा. विक्रम भाकरे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिंण प्रगतीसाठी ऑनलाइन पद्धतीने असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे. या कार्यशाळेमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

7 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago