राज्यात अनेक दिवसांपासून एसटीचा संप चालूच असून अद्यापही यावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. संपादरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. दरम्यान बडतर्फ कर्मचारी मोठ्या मानसिक स्थितीतून जाताना दिसून येत आहेत.
अशीच एक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील एका एसटी चालकाने धावत्या कार समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील देवरी फाट्यावर घडली आहे.
अरविंद अनंत चव्हाण (वय- 40) असे आत्महत्या केलेला चालकाचे नाव असून ते देवरी येथील रहिवाशी आहेत. चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा डेपो मध्ये एसटी चालक म्हणून नोकरीला होते.
एसटी संपादरम्यान चव्हाण यांना बडतर्फ करण्यात आले होत. त्यामुळे हे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तणावात होते. यामध्ये त्यांचे मानसिक संतुलन बिघडले यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
धावत्या कार समोर उडी घेतल्यानंतर चव्हाण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी त्याच कारने त्यांना अकोट येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…