‘घरकुल यादीतून माझ्या आईचे नाव का वगळले?’ अशी विचारणा करीत शिक्षकाने अकोले पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याच्या श्रीमुखात लगाविल्याची घटना अकोले तालुक्यातील केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयात घडली आहे.
या प्रकरणी शिक्षकासह तिघांवर अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लालू महादू वायाळ, दत्तात्रय गोविंद वायाळ व सुनील कोंडीबा वायाळ (सर्व रा. केळी ओतूर, ता. अकोले) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विस्तार अधिकारी काशिनाथ धोंडीराम सरोदे (52) यांनी फिर्याद दिली आहे.
तालुक्यातील केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयात काशिनाथ सरोदे हे पंचायत समितीतील विस्तार अधिकारी शासनाच्या घरकुल योजनेसंदर्भात काम करीत होते. लालू वायाळ या शिक्षकासह वरील तिघे तेथे आले. ‘माझ्या आईचे नाव घरकुल यादीतून का वगळले?’, असा सवाल करीत लालू वायाळ याने सरोदे यांना शिवीगाळ सुरू केली.
सरोदे हे त्याला समजावून सांगत असतानाच, त्याने त्यांच्या श्रीमुखात लगावून मारहाण केली. याप्रकरणी सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…