एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून लोकांचा संयम सुटत चालला असून खून आणि आत्महत्यासारख्या घटना घडत आहेत. लखनऊमध्येही असाच एक प्रकार घडला आहे.
जिथे हाताची नस कापून पत्नीनं पतीला व्हिडिओ कॉल केला, तर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे 45 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आणि फोनवर वाद झाला असता पत्नीनं हाताची नस कापून पतीला व्हिडिओ कॉल केला, त्यानंतर पतीनं आत्महत्या करुन आपलं संपवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी लखनऊमधील परसादी खेडा, पारा येथे राहणाऱ्या विवेक प्रसादचे लग्न 29 नोव्हेंबर रोजी डुडा कॉलनीत राहणाऱ्या रितूसोबत झालं होतं. विवेकचे वडील गोकर्ण यांनी सांगितलं की, तो शुक्रवारी सकाळी ड्युटीवर गेला होता आणि त्यांची (गोकर्ण यांची पत्नी) पत्नी संगीता घरी होती. संगीता गच्चीवर बसल्या होत्या. 2 जानेवारी रोजी सून रितू तिच्या मामाच्या घरी गेली होती आणि तेव्हापासून ती तिथेच होती.
त्यांनी सांगितलं की, रितूने शुक्रवारी दुपारी विवेकला फोन केला होता आणि त्यावेळी दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यानंतर रितूने ब्लेडने तिच्या हाताची नस कापली आणि विवेकला व्हिडिओ कॉल केला. दुसरीकडे व्हिडीओ कॉलवर पत्नीची अवस्था पाहून विवेक अस्वस्थ झाला आणि आपल्या खोलीत गेला. जिथे त्याने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.
आईनं छतावरून खाली येऊन विवेकचा मृतदेह पाहिला
विवेकनं गळफास लावून जीव दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. विवेकची आई गच्चीवरून खाली आल्यावर घरच्यांना हा प्रकार कळला. त्यांना खोलीत मुलगा लटकलेला अवस्थेत दिसला आणि त्यानंतर त्यांनी लोकांना बोलावलं. नातेवाईकांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विवेकचा मृतदेह खाली उतरवून लोकबंधू रुग्णालयात नेला. मात्र डॉक्टरांनी विवेकला रुग्णालयात मृत घोषित केलं.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…