राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत आज दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अमर मोहिते (वय ३१) असं या तरुणाचं नाव आहे.
अमर हा मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील होता. त्याचा भाऊ पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यानं अभ्यासासाठी अमर पुण्यात आला होता. सदाशिव पेठेतील विठ्ठल मंदिराजवळच्या हॉस्टेलमध्ये तो राहत होता. तिथंच त्यानं गळफास लावून घेतल्याचं समोर आलं आहे.
अमर हा पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं पीएसआयच्या फिजिकलमधून अमर मोहिते हा बाहेर पडला होता.
त्याशिवाय, करोना काळात अनेकदा परीक्षा रद्द झाल्यानंही तो सतत तणावात होता. त्याच तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असं बोललं जात आहे. या प्रकरणी विश्राम बाग पोलीस अधिक तपास करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…