ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या बैठकीत नुसता राडा, थेट आमदाराला खुर्ची फेकून मारली

पक्षाच्या ऑनलाइन बैठकीत तक्रार केल्यावरून शिवसेनेच्या दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये समोर आली असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू आहे.

एवढंच नाहीतर शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुख व बाजार समितीचे माजी सभापतीने थेट आमदारालाच खुर्ची फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बुधवारी ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. यावेळी वैजापूर तालुक्यातील पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. तर काही पदाधिकाऱ्यांनी वैज्ञापुरातील वसंत क्लबमध्ये बसून बैठकीत सहभाग घेतला.

याचवेळी बैठकीत उपस्थित असलेल्या शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संजय निकम यांनी आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसून, पक्षातील कार्यक्रमातून डावलले जात असल्याची तक्रार केली.

निकम यांनी तक्रार केल्याने क्लबमध्ये उपस्थित असलेल्या शिवसेना पदाधिकारी यांच्यात वाद सुरू झाला. दोन्ही गटातील शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून एकमेकांना आरोप सुरू झाले.

पुढे हा वाद इतका विकोपाला गेला की, निकम यांनी शिवीगाळ करून आमदार रमेश बोरनारे यांच्यावर खुर्ची फेकून मारली. त्यामुळे दोन गटांतील पदाधिकारी हाणामारीला उतरले होते, तेव्हा उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी मध्यस्थीकरून हा वाद मिटविला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago