कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सतरा विद्यार्थ्यांची कयू स्पायडर या प्रशिक्षण देणर्या संस्थेमध्ये निवड झाली आहे. कयू स्पायडर ही सॉफ्टवेअर टेस्टिंग संबंधित प्रशिक्षण देणारी जगातील नामांकित संस्था असून त्याद्वारे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
विद्यार्थ्यांची निवड करण्यापूर्वी कयू स्पायडर संस्थेतर्फे निवड पूर्व परीक्षा घेण्यात आली होती या मध्ये कर्मयोगी महाविद्यालयातील सतरा विद्यार्थ्यांची निवड संस्थेने केली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातील पार्थ परळीकर, वृषाली गौरव, सोहन झाडबुके, गायत्री कौलगे यांची निवड करण्यात आली तसेच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील ललिता पवार, हर्षदा बागल, सुप्रिया भोसले, प्रीती साखरे, श्रद्धा साळुंखे, शहीस्ता शेख, ऐश्वर्या बडोदकर यांची तर मेकॅनिकल इंजीनीरिंग विभागातील प्रतीक जोशी, मोहम्मद रियाज, अक्षय पाटील, अलतामश शेख, प्रद्युम्न क्षीरसागर, अपूर्व भगरे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
कर्मयोगीमधील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे प्रशिक्षण अभियांत्रिकीच्या दुसर्या वर्षा पासून च दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याधीच नोकरी मिळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. डी. बी. शिवपूजे, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी तसेच इतर सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…