टेंडर फायनल झाल्याची चर्चा
पंढरपूर हे केवळ राज्यातील एक सामान्य शहर नाही तर या शहराला कुणी दक्षिण काशी तर कुणी भूवैकुंठ म्हणून श्रद्धेने ओळखते.त्यामुळेच या शहराचे पावित्र्य जपले जावे अशी अपेक्षा भावीक आणि काही प्रमाणात येथील स्थानिक जागरूक नागिरक व्यक्त करताना दिसून येतात.तर पूर्वीच्या काळी पदाची अपेक्षा नसलेले व राजकारण्यांची वाहवा मिळविण्याची गरज भासत नसलेले वारकरी संघटनांचे अनेक प्रतिनिधी या भूवैकुंठात दारूबंदी,मास विक्री बंदी व्हावी अशी मागणीही करताना दिसून येत.पण राजकीय पातळीवर हि मागणी फारशी गांभीर्याने घेतली गेली नाही.
मात्र अशाच एका कारणामुळे हा विषय पुन्हा चर्चेत येऊ लागला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंढरपूर शहर व तालुक्यात जवळपास १५ ताडी विक्री केंद्रासाठी निविदा काढल्या.पूर्वी पंढरपुरात का केवळ २ अधिकृत ताडी विक्री केंद्रे होती.याची संख्या आता का वाढविण्यात आली हे एक गौडबंगाल आहे.स्वस्तात मिळणाऱ्या ताडीच्या पिशवीमुळे अनेक तरुणांचे आयुष्य धोक्यात आले,बहुतांश हि ताडी हि नैसर्गिक रित्या उत्पादित केलेली नसते तर पावडर मिश्रित असते त्यामुळे हि ताडी पिऊन अनेक गोरगरीब कुटंबातील तरुणांचा अकाली मृत्यू झाला अशी तक्रार जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे करत माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी नव्याने टेंडर काढून परवाने वाटप करीत ताडी विक्री केंद्रे सुरु करण्यास विरोध दर्शविला.
आज उत्पादन शुल्क विभागाकडून पुन्हा त्यांना बोलावण्यात आले व लेखी जबाब नोंदविण्यात आला.मात्र कृष्णा वाघमारे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम रहात पंढरपुरात नव्याने ताडी विक्री केंद्रे सुरु करण्यास आपला विरोध कायम असल्याचे सांगत या बाबत आमची हरकत लक्षात न घेता ताडी विक्री केंद्रे सुरु राहिली तर वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू असे निक्षून सांगितले.
मागील दोन महिण्यापुवी उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरासह जिल्ह्यात ताडी विक्री केंद्रासाठी निविदा मागविल्या.सोलापूर शहरात ताडी विक्री केंद्रे सुरु करण्यास विविध सामाजिक संघटना व कामगार संघटना व नेते मंडळी यांचा मोठा विरोध होत असल्याने तेथे याची कार्यवाही ठप्प झाली आहे.पंढरपुरात मात्र असे होताना दिसून न आल्याने माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे यांचा लढा दप्तर बंद होणार असल्याचे संकेत आहेत. आता या बाबत पंढरपुरातील विविध समाजसेवक राजकीय दृष्टीकोन बाजूला सारत या विरोधात एकवटणार का हे पाहावे लागेल.