ताज्याघडामोडी

४१ दिवसांच्या उपवासानंतर अजय देवगणने घेतले भगवान अयप्पा यांचे दर्शन

सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगण व्यस्त आहे. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेले त्याचे काही फोटो बरेच चर्चेत आहे. नुकतेच केरळच्या सबरीमाला मंदिराला भेट देत भगवान अयप्पा यांचे अजय देवगणने दर्शन घेतले. सध्या सोशल मीडियावर अजयचे हे फोटो आणि काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या मंदिरात जाण्याआधी करावे लागणारे ४१ दिवसांचे व्रतही अजयने केल्याचे बोलले जात आहे.

नुकतेच सबरीमाला मंदिरात जाऊन अजय देवगणने भगवान अयप्पांचे दर्शन घेतले. ४१ दिवसांच्या कठीण उपासनेनंतर डोक्यावर इरुमूडी घेऊन, तो सबरीमाला मंदिरांत पोहोचला होता. त्याचे यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ४१ दिवसांच्या व्रतासाठी काळे कपडे घालणे, चप्पल न वापरता फिरणे, जमिनीवर झोपणे, रोज संध्याकाळी पूजा करणे आणि तुळशीची माळ गळ्यात घालणे या नियमांचे पालन करावे लागते आणि अजयने या नियमांचे पालन केल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले.

दरम्यान आपल्या इन्स्टाग्रामवर अजयने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो काळ्या कपड्यांमध्ये आणि चप्पल न घातलेल्या लूकमध्ये दिसत होता. त्यावरून हा त्याच्या आगामी चित्रपटाचा लूक असल्याचे बोलले जात होते. अजय देवगण बुधवारी देवदर्शन करून परत आला. अजयच्या अगोदर अमिताभ बच्चन आणि विवेक ऑबेरॉय या कलाकारांनीही ही कठीण पूजा केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago