भाजपला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षीय निवडीमध्ये भाजपचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे यांनी आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पराभूत करत अध्यक्षपद पटकावले. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निर्विवाद विजय मिळवला होता. एकूण २१ जागांपैकी २१ जागांवर दरेकरांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले होते. पण त्यानंतर सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र ठरवल्यामुळे प्रवीण दरेकर यांना धक्का बसला होता. तसेच त्यांची अध्यक्षपदाची संधी हुकली होती.
दरम्यान भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना आज झालेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभवाचा धक्का बसला. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांच्यात सामना झाला. यामध्ये प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली. तर सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली. अशा प्रकारे सिद्धार्थ कांबळे यांचा दोन मतांनी विजय झाला.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…