विना मास्क व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 803 जणांवर कारवाई

4 लाख 77 हजार रुपयांचा दंड वसुल

मागील काही दिवसांत  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक पालन करीत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरु केले. यामध्ये 10  ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत तालुक्यात  803 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 लाख 77  हजार  रुपयांचा  दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय  पोलीस अधिकारी  विक्रम कदम  यांनी दिली.

 

गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाने वेळोवेळी  दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्या 387 जणांवर व वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 446 जणांवर  कारवाई करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

 

               सदरची कारवाई  पंढरपूर शहर पोलीस, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण व करकंब पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली आहे.पोलीस निरिक्षक अरुण पवार, मिलींद पाटील, धनंजय जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी केली आहे.  नागरिकांनी  मास्क वापर करावा, सार्वजनीक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवावे,  व वाहतुक नियमांचे पालन करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.

       

  

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago