गळ्याला कोयते लावल्याने अंगावरील सोने,रोख रक्कम देऊन आले
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील तरुण एका शोरूम मध्ये काम करत असून वाखरीतीलच एकजण व अनवली हे फिर्यादीच्या परिचयाचे आहेत.काही दिवसापूर्वी फिर्यादी यांचेसोबत पंढरपुर मध्ये असताना त्यांचे मित्र गणेश महाराज यांची भेट झाली होती.त्यावेळी गणेश महाराज नामक एका व्यक्तीने या तिघांना सांगतिले कि एका महिलेचा फोन येत आहे.दोन नंबरचे सोने निम्म्या किमतीत मिळतंय घेणार का असे विचारत असते.यावेळी सदर फिर्यादी व त्याचा सहकाऱ्यांची उत्सुकता जागी झाली आणि त्यांनी गणेश महाराज याच्याकडून सोने खरेदीची विचारणा करण्यासाठी आलेला मोबाईल नंबर घेतला. सदर क्रमांकावर फोन केला असता पलीकडून एका महिलेशी त्यांचे बोलणे झाले.फिर्यादी व त्याच्या सोबतच्या दोघांनी सोने खरेदीची तयारी दाखवली.
त्यावेळी त्यांनी 9373079434 नंबरवर फोन केला असता एका महिलेने निम्म्या किमतीत सोने देण्याची तयारी दाखविली व १२ जानेवारी रोजी करकंब नजीक येण्यास सांगितले.हे चोघेही करकंब येथे आले असता त्यांना पुढे टेंभुर्णी रस्ता येथे आडबाजूला नेण्यात आले व १ किलो सोने आहे असे सांगत काही अंगठया व दागिने दाखवण्यात आले.
या चौघांनी सध्या तेवढे पैसे आणले नाहीत थोडेच सोने खरेदी करणार आहे असे सांगताच सोने विक्रीसाठी आलेल्यांनी अंगात लपवलेले चाकु व गुप्तीसारखे हत्यार घेवुन फिर्यादी गळयाला कोयता लावुन सगळे पैसे काढा नाहीतर खल्लास करतो अशी धमकी देत सोने खरेदीसाठी गेलेल्या चोघांच्या अंगावरील सोने आणी रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत.
या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…