गुन्हे विश्व

निवृत्त पोलिसाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न, सुनेसह तिघांवर गुन्हा दाखल

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला विष पाजून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेसह तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सून सोनाली संतोष जाधव, वैभव ऊर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते (सर्व रा.शेंडी बायपास, वडगाव गुप्ता) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गिन्यादेव नामदेव जाधव (वय 60, मुळ रा. बोल्हेगाव, ता. नगर, सध्या रा. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

जाधव हे दुचाकीवरून मोहज येथून त्यांच्या मुलाकडे जाण्यासाठी जात असताना त्यांची सून सोनाली हिने हात दाखवून गाडी थांबविण्यास सांगितले. जाधव हे गाडी थांबवून स्टॅण्डवर लावत असताना सोनालीने त्यांना खाली पाडले. तसेच बाळासाहेब सातपुते याने हात धरले व वैभव सातपुते याने नाक दाबून तोंडात विषारी बाटलीतील औषध ओतले.

‘तू पेन्शनर पोलीस असल्याने मी तुझ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात तुला पोलिसांनी अटक केली नाही. आता तुला कोण वाचवायाला येतो? तुला वाचविणारे कोणी नाही,’ असे म्हणत शिवीगाळ करून त्यांच्या तोंडात विष ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुनेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पाठक तपास करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago