ताज्याघडामोडी

१३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसवर दगडफेक; चालक जखमी

राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेसवर कोपरगाव येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दोन्ही बसेसच्या समोरील काचांवर ही दगडफेक करण्यात आली असून हल्लेखोर पसार झाले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनात एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू आहे. सरकार वारंवार संप मागे घेण्याचं आवाहन करत असताना कामगार मात्र मागण्यांवर ठाम आहेत. काही कामगारांचं निलंबन तर काहींना बडतर्फ करण्यात आलं असून काही आगारांमधील कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आवाहन केल्यानंतर अनेक संघटनांनी संपातून माघार घेतली आहे, तर काही संघटना अद्यापही संपावर ठाम आहेत. अनेक आगारातून कमी अधिक प्रमाणात बससेवा सुरू झाली असली तरी एसटी बसवर हल्ले होत असल्याच्या घटना देखील घडत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आगाराची बस क्रमांक एम एच १३ सीयू ८४८९ ही बस आरटीओ कामासाठी कोपरगावहून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाजवळ अज्ञाताने बसवर दगडफेक करून काच फोडली असून हल्लेखोर बाजूच्या ऊस शेतीतून पसार झाले आहेत. चालक सानप आणि वाहक गरकल यांनी या घटनेची माहिती तातडीने आगार प्रमुख अभिजित चौधरी यांना दिली.

दुसऱ्या घटनेत एम एच १४ बिटी २४६० वैजापूर-कोपरगाव ही एसटी बस दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान कोपरगाव बस स्थानकातून वैजापूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. मात्र एक किलोमीटर अंतरावर कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नरच्या पुढे गेल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञान इसमांनी बसवर दगडफेक केली.

यावेळी बसमध्ये चालक एस. एस गायकवाड आणि वाहक एस. के. भागवत तसेच १३ प्रवासी प्रवास करत होते. दगडफेकीमुळे काचा बसच्या आत पडल्याने प्रवासी घाबरून गेले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. बसवर दगडफेक करून दोन्ही हल्लेखोर पसार झाले आहेत. या हल्ल्यात प्रवासी सुखरूप असून चालकाच्या डोळ्यात काचेचे बारीक तुकडे गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. मात्र या घटनेने कोपरगावसह अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago