पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा उतरणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली.
तसेच आगामी काळात भाजपला आणखी मोठे झटके बसणार असून 13 आमदार भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे आता हे 13 आमदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असून येथे निवडणुकीपूर्वी भाजपला एकामागेएक असे झटके बसताना दिसत आहेत. आजच उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनत पक्षाला रामराम करत स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला यावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटलं, स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा देत त्यांनी समाजवादी पक्षाला समर्थन देण्याचं म्हटलं. त्यांच्यासोबत 13 आमदार आणि आणखी काही सहयोगी त्यांना समर्थन देणार असल्याचंही म्हटलं आहे. तुम्ही पाहाल येत्या काळात दररोज एक-एक नवा चेहरा भाजपतून बाहेर पडेल आणि इकडे येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू संपली का? यावर शरद पवार म्हणाले, ज्या प्रकारे आश्वासन नागरिकांना देण्यात आलं आणि ज्या प्रकारचा विश्वास देण्यात आला यात काहीही तथ्य नाहीये हे उत्तरप्रदेशातील नागरिकांच्या आता लक्षात आलं आहे.
उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच उत्तरप्रदेशात जाणार असल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच एकत्र बैठकीत जागा वाटप धोरण ठरणार असल्याचं शरद पवार म्हणाले.
स्वामी प्रसाद मौर्य यांचा भाजपला रामराम
अखिलेश यादव यांची भेट घेऊन स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. स्वत: अखिलेश यादव यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. अखिलेश यादव यांनी एक फोटो ट्विट करत म्हटलं, “सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत समाजवादी पक्षात आलेले इतर नेते, कार्यकर्ते या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा.”
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…