ताज्याघडामोडी

बुलेट महागली! रॉयल एनफिल्डच्या ‘या’ बाईक्सचे वाढले भाव

रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी करणं, हे अनेक तरुणाचं स्वप्न असतं. तुम्हीही जर बुलेट बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. रॉयल एनफिल्डने जानेवारी 2022 पासून आपल्या काही बाईकच्या किंमतीत वाढ केली आहे.

यात कंपनीची लोकप्रिय बाईक क्लासिक 350, Meteor 350 आणि हिमालयनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या कोण-कोणत्या बाईकच्या किमतीत किती रुपयांची वाढ केली आहे, हे आपण या बातमीत माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Classic 350

कंपनीने आपल्या क्लासिक 350 च्या सर्व व्हेरिएंटच्या किमतीत 2,872 रुपयांपासून ते 3,332 रुपयापर्यंत वाढली आहे. यात Redditch Classic 350 (किंमत 1.87) आणि Chrome Classic 350 (किंमत 2.18 लाख) चा समावेश आहे. या बाकीची लोकप्रियता पाहता कंपनीने याच्या किंमत इतर बाईकच्या तुलनेत कमी वाढ केली आहे.

Royal Enfield Meteor 350

कंपनीने या बाईकच्या किंमत 2,511 रुपयांची वाढ केली आहे. या बाईकची किंमत 2.01 रुपयांपासून ते 2.03 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) होती. आता वाढीव किमतीसह या बाईकची 2.07 रुपयांपासून ते 2.09 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) झाली आहे.

Meteor 350 Supernova

कंपनीने आपल्या या बाईकच्या किंमत सर्वाधिक 2,752 रुपयांची वाढ केली आहे. Meteor 350 च्या लाइनअपमध्ये Supernova च्या किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. वाढीव किंमतसह आता या बाईकची किंमत 2.17 लाखपासून ते 2.19 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी झाली आहे.

रॉयल एनफिल्ड हिमालयन

कंपनीने हिमालयन बाईकच्या किंमत 4 हजार रुपयांची वाढ केली आहे. यात रॉयल एनफिल्ड हिमालयन ग्रे आणि सिल्व्हर (किंमत 2.14 लाख ) आणि रॉयल एनफिल्ड हिमालयन ब्लॅक अँड ग्रीन (किंमत – 2.22 लाख) च्या किंमती होत्या तितक्याच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र याच्या इतर तीन व्हेरिएंटमची किंमत वाढवण्यात आली आहे. ज्यात Interceptor, Continental GT आणि Bullet बाईकचा समावेश आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 month ago