मध्यप्रदेशात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका भाच्याने मित्रासोबत मिळून मामीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे घडली आहे.
तसेच तिचा विवस्त्र व्हिडीओ करुन तिला ब्लॅकमेलही केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील 21वर्षीय महिला नवऱ्यासोबत ग्वाल्हेरच्या हनुमान नगर येथे भाड्याने राहत होती. महिलेचा नवरा मजुरीचे काम करतो. घराच्या काही अंतरावर महिलेचा भाचाही राहतो. या भाच्याने 31 डिसेंबरला रात्री मामीला फोन करुन घरी महत्वाचे काम असल्याचे सांगून बोलावून घेतले. महिलाही भाच्याचे काम असल्याने लगेच त्याच्या घरी गेली.
त्यावेळी भाच्याचा मित्र आकाशही होता. भाच्याने घरी आल्यावर मामीला पाणी आणून दिले. मात्र पाणी प्यायल्य़ानंतर तिला गुंगी आली. त्याचवेळी भाच्याने आणि त्याच्या मित्राने तिच्यावर सामुहीक बलात्कार केला. एवढ्यावर तो नराधम थांबला नाही तर त्याने तिचा विवस्त्र व्हि़डीओ देखिल केला.
घटनेनंतर महिला शुद्धीत आल्यावर दोघांनी तिला कोणाकडे याबाबत वाच्छता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पतीला गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत कोणाकडे वाच्छता केली नाही. मात्र काही दिवसाने भाच्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली, अन्यथा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यासाठी 9 जानेवारीला घरी येण्यासाठी तिला धमकावले. व्हिडीओ व्हायरल करण्याच्या भितीने ती महिला त्याच्याघरी गेली. मात्र त्यावेळी महिलेने त्य़ाच्या कृत्याला पूर्णपणे विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या भाच्याने तिचा विवस्त्र व्हिडीओ रविवारी त्याच्या मामाला मोबाईलवर पाठवला. महिला घरी पोहोचल्यावर नवऱ्याने घरात भांडण सुरु केले.
मात्र महिलेने पूर्ण घटना आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यावर तो शांत झाला आणि दोघांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस स्थानकात भाचा आणि त्याच्या मित्राविरोधात सामुहीक बलात्कार आणि ब्ल्रॅकमेल केल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…