पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पत्नीच्या मृत्यूचा दाखला मागण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाने केसकरवाडी ग्राम पंचायतीचे रजिस्टर फेकून देत हातात दगड घेऊन ग्राम पंचायत कार्यालयातील कॉम्प्युटरच्या डिस्प्लेर घालून मोडतोड केल्याची फिर्याद ग्रा.प.शिपाई सहदेव बाळु ढोबळे याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार सहदेव बाळु ढोबळे वय-28वर्षे व्यवसाय -नोकरी (ग्रामपंचायत शिपाई मौजे केसकरवाडी) हे दि.10/01/2022रोजी सकाळी 10.00वा.चे सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीचे वसुली रजिस्टर चेक करीत असताना 11.30वा.चे सुमारास गावातील इसम भारत रामचंद्र देशमुख याने कार्यालयात येऊन पत्नीचा मृत्युचा दाखला मागितला असता फिर्यादीने सध्या कार्यालयात ग्रामसेवक व सरपंच असे दोघेही उपस्थित नाहीत ते आलेनंतर आपण त्यांचेकडुन दाखला घेवुन जावा असे असता भारत रामचंद्र देशमुख याने फिर्यादीस तुला लय मस्ती आली आहे काय तु ऑफिस मधुन बाहेर ये तुला दाखवतोच असेम्हणत समोरील टेबलावरील ग्रामपंचायतीचे असलेले येणेबाकी रजिस्टर त्याने हातात घेवुन जोराने दरवाज्याचे बाहेर भिरकावुन फेकुन दिले.
हातात दगड हातात घेवुन टेबलावरील कम्प्युटरचे डिसप्लेवर मारून डिसप्लेची मोडतोड व तुला लय मस्ती आली आहे काय तु ऑफिस मधुन बाहेर ये तुला दाखवतोच असे म्हणुन धमकी दिली अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…