भाजपच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यास जुन्या चपलांची भेट

आज पंढरपूर शहर पोस्टातून युवती सेनेने वतीने आज पंढरपुरात अनोख्या पध्दतीचे आंदोलन करण्यात आले. भाजप आयटी सेलचे प्रमुख जितेन गजरिया यांना पंढरपुरातील मुख्य पोस्ट कार्यालयातून पार्सलच्या माध्यमातून जुनी चप्पल पाठवित जितेन गजरिया यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध करण्यात आला आहे अशी माहिती युवती सेनेच्या तालुका प्रमुख ॲड.पूनम साईनाथ अभंगराव यांनी दिली.      

  राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या विरोधात भाजपाच्या आयटी सेलच्या जितेन गजरिया यांनी एक अक्षेपार्ह्य आणि राजकीयदृष्ट्या केवळ चिकलफेक करणारे ट्विट केले होेते. त्यात भाजपाच्या कोणत्याही नेत्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. म्हणजेच अशा विकृतीला भाजपाचे समर्थन आहे का? असा प्रश्‍न उपस्थित उपस्थित करत युवती सेनेच्या वतीने या या कृत्याचा निषेध करत असल्याचे सांगत महिलांवर वाट्टेल ते आरोप करायचे, सोशल मिडीयावरती विक्षिप्त विकृत लिखान करायचे ही भाजपाची संस्कृती आहे का? असा सवाल हि युवती सेनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.   
   पंढरपूर पोस्ट कार्यालयात करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनावेळी युवती सेना तालुका प्रमुख ॲड. पूनम साईनाथ अभंगराव,उपतालुका प्रमुख सारिका जाधव, शहर प्रमुख गायत्री गायकवाड, प्राजक्ता घुले, प्रियंका पालकर आदी युवती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago