उत्तर प्रदेशातील संभलमध्ये तैनात असलेल्या महिला इन्स्पेक्टरचा असा फोटो व्हायरल होत असून, त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
वास्तविक, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये महिला इन्स्पेक्टर ड्युटीदरम्यान एका व्यक्तीकडून पाय दाबून घेताना दिसत आहे. हा व्हायरल फोटो एसपींच्या निदर्शनास येताच महिला इन्स्पेक्टरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.
यासोबतच एसपी चक्रेश मिश्रा यांनी पिंक चौकीच्या प्रभारी पदी या महिला इन्स्पेक्टरची 2 दिवसांपूर्वी दिलेल्या नेमणूक आदेशालाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे या महिला पोलीस अधिकाऱ्याला या कारवाईमुळे जन्माची अद्दल घडली आहे.
संभलच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या महिला निरीक्षक शबनमचा एक फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. फोटोमध्ये इन्स्पेक्टर शबनम पोलीस ठाण्यात आपल्या खुर्चीवर आराम करत फोनवर बोलत असल्याचे दिसले.
तसेच समोर खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती तिचे पाय दाबताना दिसत आहे. हा फोटो गेल्या बुधवारचा आहे. दरम्यान अनेक तक्रारदारांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले, मात्र महिला निरीक्षकाने कोणाचीही तक्रार ऐकून घेतली नाही, असेही सांगण्यात येत आहे.
महिला निरीक्षकाने खुलासा केला
व्हायरल झालेल्या फोटो प्रकरणी महिला पोलिसाने स्पष्टीकरण देताना आपल्या मानेत दुखत असल्याने समोर बसलेल्या व्यक्तीकडून ॲक्युप्रेशर पद्धतीने उपचार करून घेत असल्याचे म्हटले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…