जिमला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र सरकारने जिम सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे काल (8 जानेवारी) सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहे.
निर्बंध लागू करत असताना जिम आणि ब्युटी सलून पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आज (9 जानेवारी) सरकारने सुधारित आदेश काढत ब्युटी सलून आणि जिम चालू ठेवायला परवानगी दिली आहे
आदेशानुसार जिम 50% क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिमला जाताना दोन्ही लसीची डोस आवश्यक असणार आहेत.
तसेच जिममध्ये काम करणारे कर्मचारी यांचे देखील लसीकरण पूर्ण झालेले असायला हवं, असं आदेशात म्हटले आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना मास्क घालणं देखील बंधनकारक असणार आहे.
ब्युटी सलून देखील चालू राहणार आहेत. यासाठी 50 टक्के क्षमतेची अट लागू करण्यात आली आहे. जे नियम हेअर कटिंगसाठी लागू असतील, तेच ब्युटी सलूनसाठी देखील लागू असणार आहेत. दोन्ही लसीचे डोस घेतलेलं आवश्यक असून मास्क वापरणं बंधनकारक आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…