गुन्हे विश्व

पत्नीला आधी दिला करंट पण जीव गेला नाही म्हणून कुर्‍हाडीने वार

चंद्रपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नीत झालेल्या वादाचे रूपांतर क्रूर घटनेत झाले. रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला विद्युत करंट देऊन मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र, विद्युत करंटने पत्नीचा मृत्यू झाला नाही हे लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीला ठार केले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यात आज उघळकीस आली.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जिल्ह्यातील भंगाराम तळोधी येथे घडली. योगीता राजू बावणे असे मृत महीलेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पती राजू बावणे याचावर पोलीस निगरानीत उपचार सूरू आहे.

आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचावर गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर हत्येचं नेमकं कारण काय ? याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलीस संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गर्शनात सुरू आहे.

आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचावर गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर हत्येचं नेमकं कारण काय ? याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलीस संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

1 day ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago