सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेलाय. कारण मराठा आरक्षणासाठी लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर १२ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.
यावर बोलताना पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण नाकारताना नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलं होतं. तसेच अधिकार नसतांना राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने असे आरक्षण दिल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं होतं.
मात्र मागच्या लोकसभेच्या अधिवेशनात स्पष्टपणे तरतूद करण्यात आली आहे की, सर्व आरक्षण देण्याचे अधिकारी राज्य सरकारलाच आहे. त्यामुळे ह्या सर्व मुद्यांच्या आधारावर ही याचिका दाखल करण्यात आल्याचं विनोद पाटील म्हणाले.
तर याचवेळी राज्य सरकारला विनंती करताना विनोद पाटील म्हणाले की, जे-जे करावे लागेल, जश्या-जश्या पद्धतीने मांडणी करावी लागेल, ते-ते राज्य सरकारने करावे. तसेच पुन्हा एकदा मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी विनंती विनोद पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…