विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी कटिबद्ध : डॉ. एस. पी . पाटील

बारावी नंतर चा शैक्षणिक प्रवास हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असून आयुष्याला दिशा देणारा हा काळ आहे. या अभियांत्रिकीचा चार वर्षाच्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यानी कष्ट करण्याची तयारी, अभ्यासात सातत्य व प्रामाणिकपणा ठेवल्यास तुमची स्वप्ने नक्कीच सत्यात उतरतील. कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यानी आणि पालकांनी जी जबाबदारी आणि विश्वास आमच्या वर दाखविला आहे ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवू. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी कर्मयोगी अभियांत्रिकी नक्कीच कटीबद्ध राहील असे प्रतिपादन कर्मयोगी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी केले. दिनांक ३, ४ व ५ जानेवारी २०२२ रोजी प्रथम वर्ष अभियंत्रीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन स्वागत समारंभ व पालक मेळावा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केला होता त्या प्रसंगी ते बोलत होते.

यानंतर महाविद्यालयाचे उप प्राचार्य व प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची विस्तृत ओळख करून दिली. कार्यक्रमाचे पाहुणे प्रसिद्ध समुपदेशक डॉक्टर सौ. संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील प्रवासासाठी प्रोत्साहित केले. महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. ए ए देशमाने यांनी प्रवेश प्रक्रिया आणि स्कॉलरशिप या बद्दल ची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. अभियांत्रिकी मध्ये महत्वाचा असणारा घटक म्हणजे संशोधन आहे तो कश्या प्रकारे करावा व त्यासाठी लागणारी योग्य दिशा याची सखोल माहिती महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात यांनी विद्यार्थ्यांना दिली. कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग चे विभागप्रमुख प्रा. एस एम कुलकर्णी यांनी कम्प्युटर क्षेत्रामधील संधी व त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि. कम्युनिकेशन चे विभागप्रमुख आणि महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख प्रा. डी. बी. शिवपूजे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि. कम्युनिकेशन विभागाची ओळख करून देऊन कंपनी मध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असणारे विविध कौशल्य यांची संपूर्ण माहिती दिली. सिव्हिल इंजीनीरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. ए टी बाबर यांनी सिव्हिल क्षेत्रातील आधुनिक तंत्रद्यान यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेकॅनिकल क्षेत्रातील इंडस्ट्रीज आणि त्यामधील नोकरीच्या संधी यावर मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. आर जे पंचाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन केले.

महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी यांनी इंडस्ट्री मध्ये लागणारी शैक्षणिक गुणवत्ता यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तीन दिवसीय कार्यकमामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या चार वर्षातील अभ्यासासाठी दिशा मिळाली यासाठी विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले व महाविद्यालयाचे आभार मानले.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील , कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजिस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. डी. बी. शिवपूजे तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. टी. टी. मुलाणी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago