ताज्याघडामोडी

भाजप महिला नेत्यासोबत घृणास्पद कृत्य, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये एका महिला भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ शूट करून तिच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार समोर आला आहे.

ही पीडिता भाजप महिला मोर्चाची पदाधिकारी आहे. महिला नेत्याने आपल्याच एका नातेवाईकावर हा धक्कादायक आरोप केला आहे. नशेचं औषध देऊन बलात्कार आणि ब्लॅक मेल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. महिला भाजप नेत्याने आपल्या तक्रारीत लिहिलं आहे की, केशवपुरममध्ये राहणारा त्यांचा लांबच्या नातेवाईकाचं घरी येणं-जाणँ असतं. काही दिवसांपूर्वी त्या कानपूरमध्ये एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. अचानक डोकं दुखी लागल्याने नातेवाईक जवळच्या हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी घेऊन गेला.

येथे डोकेदुखीचं औषध देत असल्याचं सांगून नशेचं औषध दिलं. महिला बेशुद्ध झाल्यानंतर नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केला. हे ही प्रचारसभेत बाईकवर उभं राहून स्टंटबाजी, बॅलन्स गेल्याने झाला पोपट; पाहा महिलेने आरोप केला आहे की, नातेवाईकाने त्याचा अश्लील व्हिडीओ शूट केला. महिलेला शुद्ध आल्यानंतर तिचे कपडे अस्ताव्यस्त होते.

तेव्हा तिला शंका आली. भाजप महिला नेत्याने आरोप केला आहे की, नातेवाईकाने त्याला पुन्हा फोन करण्याची ताकीद दिली. काही दिवसांनंतर आरोपी तिच्याकडून पैशांची मागणी करू लागला. विरोध केल्यांतर नातेवाईकाने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

बदनामी होऊ नये यासाठी महिलेने नातेवाईकाला तब्बल अडीच लाख रुपये दिले. याशिवाय आरोपी भाजप महिला नेत्याच्या मुलीवर हल्ला करण्याची धमकी दिली. ज्यानंतर पीडितेने पोलिसात याबाबत तक्रार केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago