भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य स्व.तानाजीराजे खताळ यांचे चिरंजीव अक्षय खताळ यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मागील पंधरा दिवसांपासून अक्षय खताळ नक्की कोणत्या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होऊन वडील तानाजीराजे यांचा वारसा चालविणार या चर्चेला आत्ता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा चे आमदार गोपीचंद पडळकर , भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर व जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सुभाष मस्के यांच्या माध्यमातून हा निर्णय झाला आहे . यावेळी सांगोला शहराध्यक्ष नवनाथ पवार , ऍड.गणेश ननवरे उपस्थित होते. निवडीनंतर माजी खासदार धनंजय महाडिक , अर्थ बांधकाम सभापती विजयराज डोंगरे , राज्याचे नेते संतोष पाटील , भाजपानेते संजय क्षीरसागर , शंकरराव वाघमारे , तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण , शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर , औदुंबर वाघमोडे , शशिकांत गावडे , पांडुरंग बचुटे आदींनी अभिनंदन केले .
“ओबीसींसाठी लढेन ; सर्वांचा विश्वास सार्थ ठरवेन “— अक्षय खताळ , नूतन जिल्हाध्यक्ष
आ.गोपीचंद पडळकर व तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी माझी शिफारस केल्यामुळे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे जो विश्वास माझ्यावर दाखविला आहे तो निश्चितपणे सार्थ ठरवेन त्याचबरोबर राज्यात ओबीसी आरक्षण बाबत जे चालले आहे तो लढा लढून ओबीसींच्या न्यायिक प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरणार आहे
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…