सध्या नगर पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असताना अजून उर्वरित प्रभागातील मतदान प्रक्रिया बाकी आहे. ओबीसी आरक्षित वॉर्डातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रचाराच्या तोफा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, एका अभियंताला भाजप उमेदवाराचा प्रचार करणे महागात पडले आहे.
निवडणुकांमध्ये अनेक उत्साही कार्यकर्ते विविध पक्षाचे झेंडे घेऊन प्रचार करत असतात. मात्र हिंगोलीच्या सेनगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे सहाय्यक अभियंता सत्यनारायण वडगावकर यांनी सोशल मीडियावर भाजप उमेदवाराचा प्रचार करणे महागात पडले आहे.
नगर पंचायत भाग क्रमांक ११ मधील भाजपचे उमेदवार गजानन विठ्ठलराव घोगरे यांच्या समर्थनाथ पोस्ट करुन प्रचार केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अभियंता वडगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव येथील गट विकास अधिकारी सखाराम राघोजी बेले या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सेनगाव येथील पोलिस स्थानकात सदरील गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…