शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर रश्मी ठाकरे राज्याचं नेतृत्व करु शकतील, असं मोठं आणि महत्त्वाचं विधान शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात राज्याचं नेतृत्व दुसरं कुणाकडे तरी द्यावं, अशा चर्चा होत असताना त्याचदरम्यान अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याने आता राजकीय जाणकारांबरोबर सर्वसामान्यही त्यांच्या विधानामागील राजकीय अर्थ काढू लागले आहेत.
“उद्धव साहेबांचा आदेश असला तर काहीही होऊ शकतं. मला वाटतं उद्धवसाहेब रश्मी ताईंवर जबाबदारी देऊ शकतात. आता त्या सामनाच्या मुख्य संपादक म्हणून काम करत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने जनतेपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे, हे रश्मीताईंना चांगल्या प्रकारे माहिती आहे.
राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे”, असं अब्दुल सत्तार मत राज्यातील आघाडीच्या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी व्यक्त केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…