कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्गही वाढत आहे. यापुढे कोणताही धोका नको म्हणून केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार 50 टक्के कर्मचारी कामावर बोलवा असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक ठरवून देऊन फक्त 50 टक्के उपस्थिती ठेवावी. जे कर्मचारी कंटेमेंट झोनमध्ये राहतात, त्यांना कार्यलयात बोलवू नका. सरकारी कार्यालयात 50 टक्के इतकीच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी. उर्वरित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
तसेच दिव्यांग, अपंग कर्मचारी यांना कार्यलयात बोलविण्यात येऊ नये. गरोद महिलांना सूट देण्यात यावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. दरम्यान, मुंबईत 20 टक्के रहिवासी बाधित आढळल्यास इमारत सील करण्यात याव्यात.
तसेच इमारतीतील एकूण रहिवाशांपैकी 20 टक्के रहिवासी कोरोनाबाधित आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल, असे आदेश मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…