पंढरपूरात नगर पालिकेच्या जागेची बेकायदा प्लॉट पाडून विक्री प्रकरणी अहवाल सादर करा

पंढरपूर शहरातील नगर पालिकेच्या मालकीच्या करारावर भाड्याने दिलेल्या जागेत राजकीय दबावातून करार धारकाच्या परस्पर कब्जा करून नोटरीच्या माध्यमातून गोरगरीब नागिरकांना विक्री केल्याबाबतच्या तक्रारीची दखल घेत नगर परिषद संचनालय मुंबईचे सहायक आयुक्त मिलिंद सावंत यांनी दखल घेत सदर दाखल तक्रारीची शहनिशा करून अहवाल सादर करा असे पत्र पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नगर पालिका प्रशासनास दिले आहे.   या बाबत सदर प्रकरणी तक्रारदार अनेक महिन्यापासून पाठपुरावा करीत असून त्यांनी या प्रकरणी तसेच शहरातील नगर पालिकेतील नगर रचना अधिकारी यांच्या कार्यपध्दती बाबत प्रश्चचिन्ह उपस्थित करत सहसंचालक नगर रचना विभाग पुणे यांच्याकडेही २६ जुलै २०२१ रोजी तक्रार केली होती.या तक्रारीची दखल घेत नगर रचना विभागाचे सहसंचालक वि.बा.शेंडे यांनी नगर रचना विभाग पुणे यांच्याकडून चौकशी सुरु केली असल्याचे पत्र तक्रारदारास २८ डिसेंबर २०२१ रोजी पाठवले आहे.   

 पंढरपूर नगर पालिकेत नगर रचना विभागाचे तीन अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असून बांधकाम परवाने,वापर परवाने आणी नगर नियोजनातील अडथळे ठरणारे अतिक्रमणावर कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे आहेत.गोरगरिबांच्या गल्लीबोळातील घरासमोरील किरकोळ बाथरूम सारखे किरकोळ अतिक्रमण पाडून टाकण्यासाठी तत्परता दाखविणारे हे नगर पालिकेतील नगर रचनाचे अधिकारी ठराविक ठिकाणीच कारवाई करतात असा आरोप सातत्याने होत आला आहे.आता या प्रकरणी सदर तक्रारदराने नगर पालिकेकडे केलेल्या तक्रारीबाबत यांच्याकडेही वारंवार संपर्क करून कारवाईची मागणी केली होती.परंतु त्यास वाटाण्याच्या अक्षदा दाखविण्यात आल्याची तक्रार थेट सोलापूर नगर रचना विभाग व सहआयुक्त नगर पालिका प्रशासन शाखा सोलापूर यांच्याकडे करण्यात आली.सोलापूर नगर रचनाचे कल्याण जाधव यांच्याशी पंढरी वार्ताकडून संपर्क केला असता त्यांनी या विषयाची काहीच कल्पना नसल्याचे सांगितले तर जिल्हाधिकारी कार्यालय नगर परिषद प्रशासन शाखेचे सहआयुक्त आशिष लोकरे यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पुन्हा स्मरण पत्र पाठवले आहे.    

  आता या प्रकरणी थेट नगर परिषद संचनालय मुंबई यांच्या पत्रानुसार पुणे विभागीय आयुक्त पातळीवर चौकशी केली जाऊन अहवाल सादर होणार असला तरी शहरातील नगर पालिकेच्या अब्जावधी किमतीच्या इतर मोक्याच्या जागा ९९ वर्षाच्या कराराच्या नावाखाली अनेकांच्या ताब्यात आहेत.त्या ठिकाणी पोटभाडेकरू ठेवून अनेकजण वर्षाकाठी लाखो रुपये कमाई करत आहेत अशी चर्चा सातत्याने होते.एखाद्या सामान्य व्यक्तीने घरात भाडेकरू ठेवला तर नगर पालिका ३३ टक्के भाडेकरू टॅक्स आकारते मात्र मूळ नगर पालिकेच्या मालकीच्या असलेल्या करारावरील जागा पोटभाडेकरूंना महिन्याकाठी हजारो रुपये भाडे आकारून भाड्याने दिल्या जातात,तर पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरातील एक मोक्याची जागा अशीच शहरातील एका कोट्यधीशाच्या ताब्यात गेल्या अनेक वर्षांपासून वषर्षाकाठी नाममात्र भाड्याने आहे,काही वर्षांपूवी या ठिकाणी सदर कब्जेदाराने अनेक दुकान गाळे काढले,मोक्याच्या ठिकाणी असल्याने सदर दुकान गाळ्यांना दरदिवशी पोटभाडेकरू कडून हजारो रुपये भाडेही वसूल केले जात असल्याची चर्चा असतानाच पंढरपूर नगर पालिकेच्या बांधकाम विभागाने गाळे काढणे बेकायदा व विनापरवाना असल्याची नोटीसही धाडली.पण यापुढे हे प्रकरण जागेवर थांबले.      या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे असा सूर आता उमटू लागला आहे.    

   बेकायदा नोटरी करून प्लॉट विक्री प्रकरणी लाचखोरीच्या प्रयत्न झाल्याची तक्रार

 
नगर पालिकेच्या जागेची बेकायदा नोटरी करून प्लॉट पाडून विक्री केली जात असल्या प्रकरणी तक्रारदारास काही जण रात्री अपरात्री संपर्क करून आमिष दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी तक्रार नगर पालिकेचे अतिकर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे तक्रारदाराने लेखी स्वरूपात केली असता सदर अधिकाऱ्यास तोंडी समज दिली आहे असे लेखी पत्र मुख्याधिकाऱ्याने तक्रारदारास दिले आहे.         

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

6 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

6 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago