फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे,फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी. एन. जगताप, सर्व शाखांचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच, संस्थेच्या फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये देखील हा दिवस बालिका दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. यावेळी इयत्ता तिसरी मधील कु.सोहम सुर्यकांत मेटकरी व कु.स्वरा योगेश होनराव व पहिली मधील कु.स्माही उत्कर्ष घोंगडे यांनी अनुक्रमे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला होता. कुमार हसनीन तांबोळी याने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. संस्थेचे डायरेक्टर श्री दिनेश रूपनर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी विद्यार्थ्यांना बालिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु. मृणाल राऊत यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…