ताज्याघडामोडी

‘आई, मला माफ कर…’ सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक येथील सिडको परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 24 वर्षीय नवविवाहितेनं इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असता, विवाहितेनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

प्रियांका पगारे असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय नवविवाहितेचं नाव असून ती सिडको परिसरातील खटवडनगर येथील कृष्णा अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. प्रियांका हिने रविवारी सकाळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत जीवनाचा शेवट केला आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आसपासच्या अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. ‘आई, मला माफ कर, माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये’ असा उल्लेख पीडित महिलेनं सुसाईड नोटमध्ये केला आहे.

मृत प्रियांका यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली? याची कोणतीही  माहिती अद्याप समोर आली नाही. अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago