हिंगोलीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या तरुणाचं आठ दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. संसाराची घडी बसण्याआधीच आकाशने आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या वंजारवाडी शिवराममधील शेतात असलेल्या आखाड्यावर एका लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन हिंगोलीच्या एका २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हा तरुण हिंगोलीच्या महादेव वाडी परिसरातील रहिवासी आहे. आकाश भानुदास कुटे वय २६ असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आकाशने कोणतीही सुसाइड नोट लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे.
या तरुणाने उचललेल्या धक्कादायक पावलामुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. आकाशचा आठ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. शहरातील महादेव वाडी येथील तरुणीशी त्याची रेशीम गाठ बांधली होती. परंतु लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे त्याचा संसार अर्ध्यावरच राहिला. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…